पुनश्च हरिओम..! आजपासून राज्यात दहावीची ऑफलाइन परीक्षा सुरू

169 0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहेकोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीच्या ऑफलाईन परीक्षेला आज सुरवात झाली असून शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातंय.

16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा आहे.

परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे.

नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिराने परीक्षांचा आयोजन करण्यात आलं आहे. शाळा स्तरावर परीक्षा केंद्र उपकेंद्र देण्यात आली आहेत. 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून दिली आहे. तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा देण्यात आली आहे.

दहावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक

15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

Share This News

Related Post

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Posted by - August 13, 2022 0
दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जयराम रमेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे…

पुणे : दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त देवेंद्र पोटफोडे यांची पुणे अग्निशमन प्रमुख पदी नियुक्ती

Posted by - August 29, 2022 0
पुणे : राज्य सरकारने, दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले श्री देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून…

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022 0
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक…

महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर…
Aadhar

Aadhar Card : जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता आधार कार्डची गरज भासणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Posted by - June 28, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड (Aadhar Card) आवश्यक नाही असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. केंद्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *