नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल (वय-३८) याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सोमवारी १४ मार्च रोजी कबड्डी सामना सुरू असतानाच नांगल याच्या डोक्यावर आणि छातीवर अज्ञात हल्लेखोरांनी २० राउंड फायर केले.
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सोमवारी १४ मार्च रोजी एक धक्कादायक घटना घडली. काही अज्ञात हल्लेखोरांनी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल (वय-३८) याची गोळ्या घालून हत्या केली. संदीप यांच्या डोक्यावर आणि छातीवर जवळपास २० राउंड फायर करण्यात आले. धक्कादायक म्हणजे हा प्रकार कबड्डी सामान सुरू असताना झाला.