पुणे- पुणे महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्त झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती यांचा कार्यकाळ संपला असला तरी, पुणेकरांच्या समस्या मात्र संपल्या नाहीत. येत्या काळात निवडणुकांचा कालावधी लांबला तरी विक्रम कुमार यांच्या माध्यमातून पुणेकरांच्या समस्या सुटतील. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही या शिष्टमंडळाने दिली.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, दिलीप बराटे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, बाबुराव चांदेरे, अश्विनीताई कदम, बाळासाहेब बोडके, नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ आदी उपस्थित होते.