डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. डीईएसच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
संस्कारक्षम पिढी घडविण्यात मराठी माध्यमातील शाळांचे मोठे योगदान आहे.आजची तरुण मुले मराठीत बोलताना ऐकून मोठे समाधान वाटते. माजी विद्यार्थी संघाचे उपक्रम शाळेला पूरक आणि उपयुक्त असल्याचे मत डीईएसच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आठवले यांनी व्यक्त केले.