नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला : महापौर मुरलीधर मोहोळ

547 0

पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कर्वे रस्ता आता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे. मेट्रोकडून हा पूल महापालिकेच्या ताब्यात आल्यावर पुलाच्या विद्युत व्यवस्थेचेही काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मोहोळ यांनी मांडली होती. त्यास आता मूर्त रूप आले आहे.दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पणाबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला ३५ ते ४० हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस गेला आहे’.’नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यश देखील आले आहे.

असा आहे पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल !

– महापौर मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना आणि पाठपुरावा
– पुलाची एकूण लांबी ५५० मीटर
– पुलावरून ४ पदरी वाहतूक होणार
– पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो
– मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बाळासाहेब ठाकरे उद्यानाचेही लोकार्पण येत्या रविवारी फडणवीस यांच्या हस्ते आणि पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

Share This News

Related Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

Posted by - March 3, 2022 0
महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय…

पुणे : लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील पोलीस कार्मचा-यासह १ जण जाळ्यात, वाचा सविस्तर

Posted by - November 30, 2022 0
पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करून मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पुणे…
Covid Scam Case

Covid Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; EDची मोठी कारवाई

Posted by - July 20, 2023 0
मुंबई : कोविड घोटाळा प्रकरणी (Covid Scam Case) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत…

शेतकऱ्यांना दिलासा : अतिवृष्टीमुळे पिंकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 18 लाख रुपयांचे निविष्ठा अनुदान वितरीत

Posted by - October 18, 2022 0
पुणे : अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हे. ८५ आर क्षेत्रावरील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *