पुणे: मराठी सिनेजगतातून एक दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
सुहासिनी देशपांडे यांनी मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. मनाचा कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६), आई शप्पथ..! (२००६), चिरंजीव (२०१६) आणि धोंडी (२०१७) या चित्रपटात काम केले. त्या
२०११ साली रिलीज झालेल्या सिंघम चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं यांसारख्या नाटकात भूमिका बजावल्या.
रंगभूमीवरील कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.