khupte thithe gupte

अखेर मुहूर्त मिळाला ! अवधूत गुप्तेचा ‘खुप्ते तिथे गुप्ते’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

684 0

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘खुप्ते तिथे गुप्ते’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कथाबाह्य कार्यक्रमाने कमी कालावधीत लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून हा कार्यक्रम कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. आता या कार्यक्रमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 4 जूनपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या अगोदर कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) म्हणत आहे,”ही खूर्ची देशाचं भविष्य घडवते, ही निर्दोषांना न्याय मिळवून देते, ही मानसाचा जीव वाचवते आणि ही खूर्ची प्रश्न विचारते, हिच्या प्रश्नांनाही धार आहे. खूर्चीवर बसायला कोण कोण तयार आहे? आता खूपणार नाही तर टोचणार”. या कार्यक्रमाचा हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. येत्या 4 जूनपासून हा कार्यक्रम दर रविवारी रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/reel/CrycQswuc6L/?utm_source=ig_embed&ig_rid=ed85403f-b1c0-447d-bdb3-22a3452bcd7e

हा कार्यक्रम घेणार निरोप
‘खुप्ते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने निर्मात्यांनी अखेर मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!