Breaking News

आलीय भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

296 0

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला दीड मिलियनहून अधिक व्युव्ह मिळाले आहेत.

संजय लीला भन्साळी यानी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटावरून वादही निर्माण झाला होता. गंगूबाईंच्या कुटुंबातील काही लोकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. संजय लिला भन्साळी यांचा चित्रपट आणि त्यावरून होणारा वाद याला मोठा इतिहास आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतो. याआधीही पद्मावत हा त्यांचा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटातील इतर कलाकारांना कोरोना झाला होता. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यास प्रचंड वेळ लागला होता. या आधी हा सिनेमा 6 जानेवारी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’च्या ट्रेलरवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना आलियाचा लुक आवडलाय तर काहींनी तिच्या अभिनयाची तारिफ केलीये. “आलियाने उत्तम काम केलंय,” असं एकाने म्हटलंय तर “आलियाला याआधी रोमॅन्टिक सीन करताना पाहिलं आहे. आता तिने ही बोल्ड भूमिकाही उत्तम प्रकारे साकारली आहे”, असं दुसऱ्याने म्हटलंय.

Share This News
error: Content is protected !!