मुंबई – बहुचर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे बिग बाॅस १६ ची तयारी सुरू झाली आहे. हा सीझन आतापर्यंतच्या सीझनपेक्षा नक्कीच वेगळा असणार आहे. यांच्या निर्मात्यांना या शोला टीआरपी शर्यतीत नंबर वनला ठेवायचं असल्यामुळे या शो मध्ये आणखी काय नवीन बदल करता येतील याचा विचार सुरु आहे.
बिग बाॅस या शोचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सलमान खानच्या अनोख्या अंदाजातील सूत्रसंचालकाची भूमिका सर्वानाच आकर्षित करते. आजपर्यंत बिग बाॅसचे १५ सीझन झाले आहेत आणि आता नव्या सीझनसह हा शो प्रेक्षकांसमोर यायला तयार आहे. ‘बिग बाॅस १६’ सलमान खानच होस्ट करणार आहे. शो आणि सलमानचा प्रेक्षकवर्ग यांचं एक बाँडिंग तयार झालं आहे. हा सीझन आतापर्यंतच्या सीझनपेक्षा नक्कीच वेगळा असणार आहे.
बिग बाॅस १६ या रिअॅलिटी शोमध्ये जास्त आव्हानात्मक गोष्टी असणार आहेत. स्पर्धकांना दोन टीममध्ये विभागलं जाईल. मग ट्राॅफी जिंकण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. बिग बॉसच्या निर्मात्यांना या शोला टीआरपी शर्यतीत नंबर वनला ठेवायचं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिग बाॅसचा नवा सीझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. हा वीकेण्डला रात्री १०.३०ला प्रसारित होईल आणि वीकेण्डला रात्री ९ वाजता दाखवला जाणार आहे.
१६ व्या सीझनमध्ये कोण सहभागी होतील या यादीत दिव्यांका त्रिपाठीचं नाव चर्चेत आहे. याशिवाय जन्नत जुबैर, शिवांगी जोशी आणि माही विज यांनाही बिग बाॅस १६ या शोची ऑफर मिळाली आहे. अजून पक्की बातमी कळली नाही. अर्थात, अजून थोडी वाट पाहावी लागणार.