नगर जिल्ह्यातील निघोज येथील दारूबंदी कायदेशीरच ! उच्च न्यायालयाचा निकाल

245 0

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील निघोज येथे ६ वर्षांपूर्वी झालेली दारूबंदी कायदेशीरच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निघोज येथील परवानाधारक दारू दुकाने बंद करण्याचे आदेश निघाले आहेत.

निघोज येथे महिलांच्या ऐतिहासिक लढ्यानंतर मतदानातून बहुमताने दारुबंदी करण्यात आली होती. त्यानंतर येथील सात परवानाधारक दारू दुकाने जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केली. पुढे दोन वर्षानंतर दारुविक्रेत्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून गावात दारूबंदी उठवणारा बोगस ठराव घेऊन दारू दुकाने पुन्हा सुरू केली होती .

निघोज येथे दारूबंदी होण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकजागृती सामाजिक संस्थेच्या विश्वस्त कांता लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दारूबंदी हटवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्याकडे आव्हान दिले होते. राज्य आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांचा दारूबंदी उठवण्याचा निर्णयाला बेकायदेशीर ठरवून स्थगिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा निघोज येथील परवानाधारक दारू दुकाने बंद करण्याचे आदेश निघाले.

त्यानंतर दारू विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देवून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर घेण्यात आली.

न्यायालयाने यावेळी राज्य उत्पादनशुल्क आयुक्त यांनी निघोजला पुन्हा दारूबंदी केल्याचा निर्णय योग्य असण्यावर शिक्कामोर्तब करून याचिकाकर्त्याला राज्य सरकारकडे याविषयी दाद मागण्याची मुभा ठेवली. राज्य उत्पादनशुल्क आयुक्त यांनी निघोजला पुन्हा दारूबंदीचा घेतलेला निर्णय योग्य असून त्यात हायकोर्ट हस्तक्षेप करू इच्छित नाही असे म्हणत दारूविक्रेत्यांची याचिका निकाली काढली. याबाबतची याचिका दारूविक्रेत्यांच्या वतीने विष्णू श्रीहरी लाळगे यांनी दाखल केली होती.

Share This News

Related Post

#चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवड मतदार संघामध्ये 41.1 % मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते…
fire

रत्नागिरीतील लोटे MIDCमध्ये भीषण आग; Video आला समोर

Posted by - May 5, 2023 0
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. नायट्रिक अ‍ॅसिड गॅस गळती झाल्यामुळे हि…
Raj Thackery

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Posted by - May 27, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील (Maharashtra Politics) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची…
Sharad Pawar

Sharad Pawar : अजितदादा गोविंदबागेत भेटायला का आले नाही? शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - November 14, 2023 0
पुणे : दिवाळी पाडवा निमित्त बारामती येथील गोविंदबागेत आयोजित केलेला भेटीगाठीचा कार्यक्रम संपला. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad…

आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !

Posted by - July 10, 2022 0
  पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण मंदिराला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *