बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारतावर काय होणार परिणाम?

901 0

ढाका (बांगलादेश): भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये मोठा संघर्ष उफाळला आहे. आतापर्यंत 100 हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला या संघर्षानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. शेख हसीना या सध्या भारतामध्ये असून त्या लंडनमध्ये जाण्याची शक्यता आहे.

बांगलादेशमध्ये नेमकं काय घडलं?

गेल्या महिन्यात, बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पोलीस आणि सरकार समर्थक निदर्शकांशी हिंसक झटापट सुरू आहे. या निदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संघर्षातून शंभरहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

शेख हसीनांच्या राजीनाम्याचा भारतावर परिणाम काय? 

बांगलादेशात राजकी अस्थिरता निर्माण झाली आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय आयात-निर्यात आणि व्यापारावर होणार आहे. भारत आणि बांगलादेश हे शेजारी असल्याने, दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहे. त्यावर देखील आता थेट परिणाम होणार आहे. काही बाबींमध्ये भारत बांगलादेशकडून आयात करतो. मात्र, बांगलादेश ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आता बांगलादेशात राजनीतिक संकट उभे ठाकल्याने त्याचे मोठे नुकसान हे व्यापारिकदृष्ट्या भारताला सोसावे लागणार आहे.

Share This News

Related Post

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 10, 2022 0
देशाचे नेते आदरणीय खा. शरदचं पवारसाहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महाराष्ट्राच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टीच्या वतीने…

पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Posted by - April 28, 2022 0
पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा चौकात दोन कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघांना लोणी काळभोरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
Gulabrao Patil Mother

Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आईचे निधन

Posted by - September 6, 2023 0
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या…

दिल्लीतील ट्वीन टॉवर आज होणार जमीनदोस्त; काय आहे कारण

Posted by - August 28, 2022 0
नवी दिल्ली:  नोएडा येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज रविवारी (ता.28 ऑगस्ट) रोजी दुपारी अडीच वाजता पाडण्यात येणार आहेत.…
Amartya-Sen-Died-news

Amartya Sen : नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा

Posted by - October 10, 2023 0
नवी दिल्ली: नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन (Amartya Sen) यांची कन्या नंदना देब सेन यांना मंगळवारी त्यांच्या वडिलांचे निधन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *