मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असून 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा असणार आहे…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सध्या सुरू आहे मराठवाड्यानंतर आता मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र मध्ये असणार असून 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रात दौरा असणार आहे.
कसा असेल मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा
7 ऑगस्ट सोलापूर
8 ऑगस्ट सांगली
9 ऑगस्ट कोल्हापूर
10 ऑगस्ट सातारा
11 ऑगस्ट पुणे
12 ऑगस्ट अहमदनगर
13 ऑगस्ट नाशिक
मराठा आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी ही मनोज जरांगे पाटील यांनी केली असून याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा दौरा महत्त्वाचा असणार आहे