कराची- पाकिस्तानात उठलेल्या राजकीय वादळात इम्रान खान यांना आता पायउतार होण्याची वेळ आलेली आहे. इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारमधील सहयोगी पक्ष असलेल्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान या पक्षानेही विरोधकांशी हातमिळवणी केल्यामुळे इमरान खान सरकार संकटात सापडलं आहे. त्यामुळे पाकिस्तानातील राजकारणात आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित करत भारताची स्तुती गायली. मात्र या भाषणाची पाकिस्तानात खिल्ली उडू लागली आहे.
आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी मी माझे आणि मला या शिवाय दुसरे काहीही म्हटले नाही. यावेळी त्यांनी भारताची स्तुती केली तसेच आधीचे राज्यकर्ते लष्कर कसे चुकले ते देखील सांगितले. भाषणात इम्रान खान यांनी स्वत चा २१३ वेळा उल्लेख केला आहे . यामध्ये ८८ वेळा में १६ वेळा मुझे ११ वेळा मेरा आणि १४ वेळा इम्रान खान असा उल्लेख केला आहे.
पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर याने इम्रान खान यांचा हा व्हिडीओ बनविला आहे. यामध्ये इम्रान खान यांनी में मेरा आणि मुझे किती वेळा म्हटले याची खिल्ली उडविली आहे.
https://twitter.com/GanGhufoor/status/1509876977473253376
इम्रान खान यांच्यावरील अविश्वास ठरावावर 3 एप्रिलला मतदान
पाकिस्तानात महागाई गगनाला भिडलेली आहे, इम्रान खान यांची लोकप्रियता घसरणीला लागलेली आहे आणि विरोधी पक्षांनी इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी अविश्वास ठराव आणलेला आहे. इमरान खान यांच्या विरोधातला हा अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला असून 31 मार्चपासून यावर चर्चेला सुरुवात होईल. 3 एप्रिलला या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात येईल.