पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

106 0

पुणे- पुणे महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

शहरातील महापालिकेच्या हद्दीत अनेकांनी अनधिकृतपणे बांधकामे केली आहेत. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या या बांधकामांसाठी गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी १० जानेवारी ते 31 मार्चपर्यन्त प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली होती. महापालिकेच्या या मोहिमेला आतापर्यंत केवळ 77 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

नियमितीकरणाची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे. अनधिकृत बांधकाम अधिकृत करवून घेत असताना संबंधित नागरिकाला हा प्रस्ताव इंजिनिअरच्या माध्यमातून सादर करावे लागतात. मात्र यासाठी इंजिनिअर भरमसाठ फी आकारत असल्याने नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे आता महापालिकेने गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्कीटेक्ट अथवा इंजिनिअरने 5 हजार रुपये फी आकारावी, असे आवाहन केले आहे.
आता ही मुदत संपल्यामुळे आता ३० जूनपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली आहे.

काय नियमितीकरण मोहीम

बांधकाम नियमावलीतील अटींमुळे छोट्या भुखंडांवर महापालिकेची परवानगी घेउन घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृतपणे ही बांधकामे केली आहेत. यापैकी जी घरे नियमान्वित होऊ शकतात, त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये ती शुल्क आकारून अधिकृत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Share This News

Related Post

पुण्यात राजकीय उलथापालथ : मनसेचे निलेश माझीरे यांच्यासह 400 पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र !

Posted by - December 5, 2022 0
पुणे : पुण्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अर्थात मनसे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे यांना पदावरून हटवल्यानंतर…

मोठी बातमी! पुणे महानगरपालिकेच्या मिळकतकरातील 40% करसवलत कायम

Posted by - April 19, 2023 0
पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर…

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे पालिकेच्या पहिल्या रक्तपेढीचे लोकार्पण

Posted by - March 12, 2022 0
पुणे- महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी…

‘बेताल ,सत्तापिपासू चंपा’ रुपाली पाटील यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

Posted by - May 26, 2022 0
पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी समाचार घेतला आहे. रूपाली पाटील यांनी चंद्रकांत…

मराठवाड्याच्या ‘या’ 5 दिग्गज नेत्यांची ‘अकाली एक्झिट’ ; TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Posted by - August 18, 2022 0
मराठवाड्याच्या मातीनं केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीनं भुरळ पाडत जनमानसाचा आवाज बनलेले असंख्य नेते मराठवाड्यानं दिली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *