Breaking News
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

597 0

सांगली : वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा बुधवारी सांगलीमध्ये पार पडली. या सभेमध्ये वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पाहार घातला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सांगलीत सभेवेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचाही फोटो ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये असे पोलिसांनी सांगितले. पण प्रकाश आंबेडकर यांनी तरीदेखील टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घातला.

पोलिसांना दिला इशारा
आज टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला. पण काहींनी घालू नका असं सांगितलं होतं. तुम्ही टिपू सुलतानच्या फोटोला हार घातलात तर बघा असा इशारा दिला होता. पण माझं पोलीस खात्याला आवाहन आहे की पाच वर्षांनी निवडणुका येतात आणि सरकार बदलतं. आतापर्यंत आम्ही कधीच निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी व्हायचा प्रयत्न केला नाही. पण या निवडणुकीत सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. पोलिसांनी घटनेप्रमाणे वागावं. त्यांनी कायद्याप्रमाणे वागावं. सरकार सांगतंय तसं वागू नका असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Team India Head Coach : BCCI ने टीम इंडियाच्या हेड कोचचे नाव केले जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली टीमची कमान

Share This News
error: Content is protected !!