Sharad Pawar

पवारांनी आमदारांचे टोचले कान; महाविकास आघाडी एकसंध ठेण्याचे केले आवाहन

846 0

पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आमदारांचे कान टोचले आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई (Yashwantrao Chavan Centre, Mumbai) या ठिकाणी ही बैठक पार पडली. या बैठीकीमध्ये शरद पवार यांनी राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच पक्षाच्या काही बड्या नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे. दरम्यान तालुका आणि जिल्हा अध्यक्ष देखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कोणत्या नेत्यावर सोपवली जबाबदारी
नागपूर विभागाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
अमरावती विभागाची जबाबदारी राजेंद्र शिंगणे यांच्या कडे देण्यात आली आहे.
तर नाशिक अहमदनगरसह मराठवाडा विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगलीची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
पुणे विभागाची जबाबदारी सुनील शेळके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये अशोक पवार तर खानदेशची जबाबदारी एकनाथ खडसे आणि अनिल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कोकण विभागाची जबाबदारी अनिकेत तटकरे आणि शेखर निकम यांच्याकडे देण्यात आली आहे.
ठाणे पालघरची धुरा जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Share This News

Related Post

accident

बुलढाण्यामध्ये बाईक आणि कारची धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 7, 2023 0
बुलढाणा : बुलढाण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. बाईक आणि कारची धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं घेतलं दर्शन

Posted by - September 2, 2022 0
पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर – सहकार मंत्री अतुल सावे

Posted by - October 13, 2022 0
मुंबई : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय…

दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक साहाय्य : सरकारचा मोठा निर्णय

Posted by - August 18, 2022 0
मुंबई : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना…
Dead

बहिणीला भेटण्यासाठी निघाला मात्र तिकडे पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 4, 2023 0
परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा उष्माघाताने (heatstroke) मृत्यू (Dead)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *