बंगळुरू : कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये (Karnatak election) काँग्रेसला (Congress0 स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यांना 22 वर्षांनंतर बहुमत मिळाले होते. यानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार (DK Sivakumar) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्यापैकी यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 13 मेला कर्नाटकचा निकाल लागला. मात्र आज 4 दिवस होऊनदेखील कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. यादरम्यान पार पडलेल्या एका बैठकीमध्ये डी के शिवकुमार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.
नेमके काय म्हणाले डी के शिवकुमार ?
सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असे वक्तव्य डी के शिवकुमार यांनी केले आहे. डी के शिवकुमार यांच्या या वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी यांच्या निर्णयाकडे काँग्रेस नेत्यांसह कर्नाटकच्या जनतेचं लक्ष लागून राहिले आहे.
कर्नाटकचा निकाल
कर्नाटकात 22 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता आली आहे. 224 पैकी 137 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर भाजपकडे 65 जागा आहेत. 19 जागांवर जेडीएसला यश मिळालंय. तर अपक्ष आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत.