Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

3205 0

धुळे : लोकसभा निवडणुकीचे सध्या 2 टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी होणार आहेत. मात्र त्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. धुळे लोकसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार माजी IPS पोलीस अधिकारी अब्दुल रहेमान यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया दरम्यान अब्दुल रहेमान यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.

का अर्ज ठरला अवैध ?
माजी आयपीएस पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांनी 2019 साली आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा मंजूर न झाल्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.

यांच्यात होणार लढत ?
धुळे मतदारसंघात भाजपने तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता धुळ्यात वंचितचा दुसरा उमेदवार कोण असेल? कुणाला पाठिंबा मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Junnar News : बैलगाडा शर्यतीदरम्यान गेला तोल; मात्र पठ्ठयाने प्रसंगावधान राखत पूर्ण केली शर्यत

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Gangadhar Gade : ज्येष्ठ नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं निधन

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Pune News : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

Share This News
error: Content is protected !!