पंजाब राज्यात आम आदमी पक्ष मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकलं असून त्याचबरोबर भगवंत मान यांनी विधानसभेची जागाही जिंकली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दलबीर सिंग गोल्दी यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.
निकालाच्या दिवशी सकाळी भगवंत मान यांनी गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली होती. ते संगरूर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना येथे पोहोचले होते.
पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांनीही गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली.
सर्व एक्झिट पोलमध्ये असे सांगण्यात आले होते की, यावेळी आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करू शकते.
“आप”ने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले होते. ते सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.
भगवंत मान हे सध्या आम आदमी पार्टीचे खासदार आहेत. ते दुसरी वेळेस लोकसभेत पोहचले आहेत. ते संगरूर मतदारसंघाचे खासदार आहेत.
धुरी विधानसभा मतदारसंघ याच भागात येतो. पंजाबच्या धुरी विधानसभेतून भगवंत मान 38,000 हून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी भारतातील पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात झाला. त्याने पंजाबमधील संगरूर येथील एसयूएस (SUS) कॉलेजमधून बीकॉम BCOM केले आहे. वाणिज्य क्षेत्रात पदवी घेतली.
भगवंत मान यांनी कॉमेडीपासून ते राजकारणापर्यत सर्वत्र स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भगवंत मान यांनी इंद्रप्रीत कौरशी लग्न केलं होते.
भगवंत मान हे सुरुवात मनप्रीत सिंग बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीसोबत सोबत झाली होती. 2012 मध्ये त्यांनी लेहरा विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश मिळाला नाही. यानंतर भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.
2014 मध्ये, भगवंत मान आम आदमी पक्षात सामील झाले आणि आम आदमी पक्षाच्या तिकीटावर संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आपले नाव रिंगण केले. येथे त्यांनी 2 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.