Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपूल कोसळला; ‘हा’ आमदार थोडक्यात बचावला

803 0

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) आज सकाळच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली आहे. चिपळूण इथं एक नाका येथील उड्डाणपूल कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत.

काय घडले नेमके?
चिपळूण इथं गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. आज सकाळी काम सुरू असताना काही भागाला अचानक तडे गेले होते. मात्र दुपारी दोनच्या दरम्यान उर्वरित पुलाचा भाग संपूर्ण कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Share This News
error: Content is protected !!