अहमदनगर : अहमदनदर-आष्टी रेल्वेला (Ahmednagar Ashti Railway) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत रेल्वेचे तीन ते चार डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
वर्षभरापूर्वीच अहमदनगर आष्टी ही रेल्वे सुरु करण्यात आली होती. रेल्वे विद्युतीकरणासाठी काही काळ बंद करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेल्वेसेवा सुरू झाली होती. या रेल्वेला म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नव्हता.