Video

Ajit Pawar : अजितदादांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

492 0

भंडारा : भंडारा जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar) हजेरी लावली. डेंग्यू झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. एका शेतकऱ्याने बच्चू कडू यांचा फोटो असलेला बॅनर घेत घोषणाबाजी केली. या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, की काही कारणांनी हा कार्यक्रम पुढे जात होता. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं दिवाळीनंतर पहिला कार्यक्रम भंडाऱ्यात करायचा. शासनाच्या कल्याणकारी योजना यामुळे सामान्य जनतेला मिळतात. भंडारा निसर्ग पर्यटनासाठी अनुकूल जिल्हा आहे. या ठिकाणी मुबलक पाणी आहे. आमच्या सरकारच्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हायला हवा. राज्यातील प्रत्येक नागरिकाला हे सरकार माझ्यासाठी काम करत असल्याची भावना निर्माण व्हायला पाहिजे. गेल्या सव्वा वर्षात सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. पीक विमा योजना अतिशय महत्वाचा निर्णय सरकारने घेतला. आमच्या सरकारचा हा अतिशय महत्वाकांक्षी निर्णय आहे. जिथे अतिवृष्टी झाली. कमी पाऊस झालं तिथे वीमा वाटप झाले. एक हजार नऊ लाख चौपन कोटी रुपयांचे वाटप यातून होणार आहे. आम्ही मूळ शेतकरी असल्याने आम्हाला अडचणी माहिती आहे. एखाद पीक गेलं की त्याच्या अडचणी वाढतात आणि शेतकरी नाउमेद होऊन आत्महत्येचा विचार करतो.

कार्यक्रमातील गोंधळावर अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवारांच्या भाषणादरम्यान एक शेतकरी हातात बॅनर घेऊन सरकार विरोधात नारे लावत पुढे आला. बॅनरवर बच्चू कडूंचा फोटो होता. यावेळी काहीसा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. यावर अजित पवार म्हणाले, की काही विरोधक असे लोक पाठवून कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Share This News
error: Content is protected !!