उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला होळी व धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा

112 0

“समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळीचा सण साजरा करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्या. वृक्षतोड न करता पर्यावरणपुरक होळी साजरी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्राच्या गावखेड्यात, विशेषत: कोकणात साजरा होणारा होळीचा सण यंदाही आनंदात, उत्साहात साजरा होऊ दे. समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी, परंपरांचा विनाश होऊ दे. राज्यातल्या घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे.

होळी व धुलीवंदन साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगाचा वापर करावा. डोळे व त्वचेला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन सुरक्षित होळी साजरी करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Share This News

Related Post

सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण बर्फात गाडले गेल्याची भीती

Posted by - April 4, 2023 0
सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एक मुलगा यांचा…

#PUNE : दारू पिऊन शिवीगाळ केली म्हणून शेजारच्या महिलांनी केली मारहाण; अपमान सहन न झाल्याने रिक्षाचालकाने संपवली जीवन यात्रा

Posted by - March 27, 2023 0
पुणे : विश्रांतवाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धानोरे परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकांन खाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली…

#MADHAV BHANDARI : राज्यातील प्रत्येक घटकाला आनंद देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Posted by - March 14, 2023 0
‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे ‘पंचामृत’ सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक घटकाच्या आशांना प्रतिसाद…

शेवटी मराठी माणसालाच…; ‘कॅग’च्या अहवालावरून रोहित पवारांचा मोठा दावा

Posted by - August 19, 2023 0
नवी दिल्ली: नितीन गडकरी यांच्या रस्ते विकासाच्या कामाचं सर्वत्र  कौतुक होताना पाहायला मिळतं. नितीन गडकरी हे राजकारणात अजातशत्रू व्यक्तीमत्व मानलं…
Ajit Pawar

Ajit Pawar : अनेकांना राजकारणाचे धडे देणारे अजित पवार स्वतः आहेत 10 वी पास !

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्याला जणू राजकीय भूकंपाची सवयच झाली आहे. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *