आमदारांची चांदी, आमदार निधीत एक कोटी रुपयांची वाढ ; अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

67 0

राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आला आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली.

तर आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटींवरुन पाच कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे.

त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

तर आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यांत आला

नव्या निर्णयानुसार आता आमदारांना स्थानिक विकासासाठी पाच कोटी रुपये दिले जातील. या निधीतून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासाची कामं करता येणार आहेत.

विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार आहे. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधानपरिषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे.

“महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. यातील राष्ट्रवादीला जास्त निधी दिला जातो आणि शिवसेना काँग्रेसला कमी निधी दिला जातो, असा विरोधकांनी आरोप केला आहे. परंतु, हा निधी कोणत्याही एका वैयक्तीक पक्षाचा नसतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे. यात विविध पक्षाचे मंत्री होते. तसंच आमचंही तीन पक्षाचं सरकार आहे. निधी देत असताना पक्ष पाहिला जात नाही,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

खुर्चीवर बसण्यावरून झाला वाद आणि संतापलेल्या तरुणाने थेट गोळीच झाडली

Posted by - March 30, 2023 0
एका फायनान्शियल कंपनीच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यातून संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यामध्ये सहकारी कर्माचारी…
Maharashta Politics

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले…
Supriya-Sule

#PUNE : पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खासदार सुप्रिया सुळे

Posted by - March 9, 2023 0
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया…

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी 70 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त

Posted by - December 29, 2022 0
पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बॉक्स साठा…
CM EKNATH SHINDE

कार्तिकी एकादशी : महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : ‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे. अन्नदाता शेतकरीराजा, कष्टकरी, मेहनती उद्यमी बांधवांच्या आयुष्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *