सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी एसआयटी तपास यंत्रणावर संशय व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी मॅनेज करण्यासाठी राजकीय पावर वापरून दबाव टाकला जात असल्याचा देखील गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बीडमध्ये बोलत असताना तपास यंत्रणा या देशमुख कुटुंबाचा विश्वासघात करत आहेत असा संशय धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.वाल्मीक कराडने 31 डिसेंबर 2024 ला शरणागती पत्करण्यापूर्वी 3 आलिशान गाड्यांमधून बीड ते पुण्यात जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये वाल्मीक कराडची सफेद रंगाची स्कॉर्पिओ देखील दिसतीये. अशातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यंत्रणांवर संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? असाही प्रश्न धनंजय देशमुख यांनी विचारलाय. व्हिडीओ आहेत मग महत्त्वाचे पुरावे का भेटत नाहीत? असा प्रश्न समाजाला पडत आहे. जिल्ह्यातच सगळे हे आरोपी होते. शिवलिंग मोराळे याची गाडी 29 तारखेपासून ताब्यात आहे. तपासी यंत्रणा या देशमुख कुटुंबाचा विश्वासघात करत आहेत, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. आरोपी हे मॅनेजमेंट साठी कामाला लागले आहेत आणि खंडणी, माराहान, खून या मधील फिर्यादीला दबावतंत्र आणि राजकीय पावर वापरुन मिटवायचा प्रयत्न सुरू आहे, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
