सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीच आत्मीयता नाही अतुल खुपसे-पाटील

368 0

विरोधी पक्ष जेव्हा सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता दाखवतो, पण एकदा का सत्तेत गेला की शेतकऱ्यांबद्दल असणारी आत्मीयता नाहीशी होती आणि सत्तेच्या खुर्च्या उबवण्याचा आनंद घेतात. त्यामुळे जगाचा अन्नदाता कमजोर होतो. त्याला कोणीच आधार देत नाही. आणि तो आपल्या सारख्या संघटनेकडे आशेने पाहतो. त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी तळमळीने काम करा असे आवाहन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी केले.

करमाळा शासकीय विश्राम गृह येथे जनशक्ती संघटनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या पद नियुक्त्या देण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी वारकरी संप्रदाय महाराष्ट्र प्रमुख अविनाश महाराज कोडलिंगे, उपजिल्हाप्रमुख अतुल राऊत, करमाळा उपतालुकाप्रमुख वैभव मस्के, पांडूरंग भोसले, शरद एकाड, विद्यार्थी करमाळा तालुका प्रमुख रामराजे डोलारे, विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष, किशोर शिंदे, करमाळा महिला तालुका उपप्रमुख कोमल खाटमोडे, करमाळा सोशल मीडिया प्रमुख सागर शिंदे, तालुका युवा आघाडी कार्याध्यक्ष अजीज सय्यद, तालुका सरचिटणीस प्रदीप शिंदे आदी निवडी करण्यात आल्या.
या निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व संघटनेची शपथ देण्यात आली.

Share This News

Related Post

Vijay-Wadettiwar

मविआत मोठा भाऊ कोण? वडेट्टीवारांनी दिले स्पष्ट उत्तर

Posted by - May 22, 2023 0
नागपूर : सध्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार…

मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि नंतर मेळावा घ्यावा

Posted by - September 25, 2022 0
पुणे: राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्ता नाट्यानंतर अखेर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची…

राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

Posted by - April 20, 2022 0
सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Posted by - November 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य…

‘संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याच्या विरोधात दिल्लीत एफआयआर दाखल करणार’

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच कामाचे नाहीत. राज्य कसे चालवायचे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिका असा सल्ला नवनीत राणा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *