मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात

529 0

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्याच्या दिशेनं भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानंतर कार्ला फाटा सोडल्यानंतर ही कार दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेनं जाणार्‍या कंटेनरखाली घुसली. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली कार आणि प्रवासी यांना बाहेर काढलं. दरम्यान या घटनेमुळं मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

Share This News

Related Post

#IRCTC टूर पॅकेज : भारतीय रेल्वे फक्त 7 हजारात तिरुपती बालाजीची भेट घडवून देणार, जाणून घ्या पॅकेजशी संबंधित सविस्तर माहिती

Posted by - March 13, 2023 0
जगभरात आपल्या संस्कृती आणि परंपरेसाठी प्रसिद्ध असलेला भारत धार्मिक स्थळ म्हणूनही खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी अनेक लोक केवळ सुंदर पर्यटनस्थळांना…

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणावर सपासप वार; काय आहे प्रकरण

Posted by - June 5, 2022 0
पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी…

उमेदवारांसाठी महत्वाची माहिती : MPSCआणि B.Ed CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - August 17, 2022 0
मुंबई : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना…

एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती-शरद पवार

Posted by - July 23, 2022 0
पुणे: आमचे नेते एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आली होती तरी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा दिली नव्हती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *