Marjariasana

Health Tips : पचन क्रिया सुधारण्यासाठी सकाळी नाश्त्याआधी करा ‘हे’ आसन

523 0

सकाळी झोपेतून उठलंकीच अनेकदा आपल्याला थकल्यासारखं (Health Tips) वाटत असतं. 7 ते 8 तासांची पूर्ण झोप घेऊनही पूर्ण फ्रेश (Health Tips) वाटत नाही. आणखी तर पुढे पूर्ण दिवस जायचा असल्याने सकाळीच असा थकवा असेल तर दिवस कसा जाणार असा प्रश्नही आपल्याला पडतो. मात्र दिवसाची सुरुवात चांगली झाली की, संपूर्ण दिवस चांगला जातो.आपली ताकद वाढवायची असेल तर व्यायामाला पर्याय नाही. व्यायाम करायचा आहे पण वेळ नाही अशी सबब आपण अनेकदा देतो. हे खरेही असू शकते. मात्र दिवसभरात व्यायामासाठी वेळ नसेल तर सकाळी काही सोपे योगा आसन केल्यास तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

सामान्यतः, सूर्यनमस्कार हे तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम आसन आहे, परंतु आरोग्याच्या अनेक समस्या असलेल्या लोकांसाठी, मार्जरी आसन हा दिवसाची सुरुवात करण्यासाठी चांगला मार्ग आहे. आणि हे आसन तुम्ही चटईशिवायही करु शकता. ज्यांना वेळेची मर्यादा आहे त्यांनी सकाळी उठल्यावर अंथरुणातच संपूर्ण शरीर पूर्णपणे ताणले पाहिजे.अंथरुणावर असताना स्ट्रेचिंगसह दुसरी हालचाल म्हणजे तुमचे पाय दुमडून तुमचे शरीर फिरवणे आणि गुडघे एका बाजूला सोडणे आणि डोके दुसऱ्या बाजूला वळवणे.या दोन सोप्या हालचालींनंतर तुम्ही तुमचा दिवस सुरू करू शकता.

मार्जरी आसन कसे करावे
१) मांजरीप्रमाणे चार पायांवर गुडघ्याच्या व हाताच्या सहाय्याने उभे राहा. अशाप्रकारे टेबल बनवा की तुमची पाठ म्हणजे टेबलाची वरची बाजू आणि तुमचे हात व पाय हे टेबलाचे पाय होतील.
२) तुमचे हात जमिनीला लंबरूप ठेवा, हात हे खांद्याच्या बरोबर खाली असले पाहिजेत आणि हाताचे तळवे हे जमिनीवर सपाट असावेत; दोन्ही गुडघ्यांमध्ये नितंबांच्या रुंदीइतके अंतर ठेवावे. दृष्टी समोर सरळ ठेवावी.
३) जसा तुम्ही श्वास आत घेऊ लागता तसे हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे, तुमच्या नाभीला खालच्या दिशेला ढकलावे आणि पुच्छहाडाला वर उठवावे. या मांजरीच्या पवित्र्यात थोडा वेळ रहा आणि दिर्घ श्वास घ्या.
४) आता केलेल्या स्थितीच्या अगदी विरुद्ध स्थिती करा.जसजसे तुम्ही श्वास सोडू लागता तसतसे हनुवटीला छातीकडे आणा आणि पाठीची तुमच्या क्षमतेनुसार कमान करा; नितंबांना सैल सोडा. या स्थितीत थोडी सेकंदे रहा आणि मग तुमच्या पहिल्या टेबलच्या स्थितीत परत या.

मार्जरी आसनाचे फायदे
१) हे पोट, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड, आतडे यांसारख्या पाचन तंत्राच्या सर्व अवयवांना सक्रिय करते.तसेच चांगले पचन समस्या आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते.
२) पाठीच्या कण्याला लवचिकता आणते, मनगटे आणि खांद्यांना बळकटी आणते. थायरॉईड ग्रंथींना मसाज करते, त्यामुळे समतोल राखण्यासाठी आणि होमिओस्टॅसिससाठी हार्मोन्सचे कार्य योग्य पद्धतीने होते.
३) शारीरिक-मानसिक समन्वय वाढवते. किडनी आणि अधिवृक्क ग्रंथी सारख्या उदर अवयवांना उत्तेजित करते. भावनिक संतुलन निर्माण करते, तणाव दूर करून मन शांत होते.

(टीप : पाठीच्या किंवा गुडघेदुखीने त्रस्त असलेल्यांना, गर्भधारणेदरम्यान, मानेला दुखापत किंवा दुखणे असल्यास, डोक्याला दुखापत झाल्यास याचा सराव करू नये.तरीदेखील हे आसन करण्याअगोदर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या..)

Share This News

Related Post

Health Tips

Health Tips : रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ 5 सवयी लक्षात ठेवा; 15 दिवसांत वजन होईल कमी

Posted by - November 14, 2023 0
आजची लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळं अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या (Health Tips) तीव्र होत जात आहे. वजन कमी करण्यासाठी डायटिंग केले…
Bhujangasana

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 2, 2024 0
सूर्य नमस्कारामध्ये एकूण बारा आसने असतात, त्यातील आठवे आसन म्हणजे भुजंगासन (Bhujangasana) होय. भुजंग म्हणजे साप/ नाग. त्यामुळे भुजंगासनाला ‘सर्पासन,…

असे काय आहे ‘ काळ्या पाण्यात ‘ ज्यामुळे सेलिब्रिटींसाठी आहे एक नंबरचे चॉईस

Posted by - June 23, 2022 0
सिनेमा आणि त्याचा इन्फ्लुईन्स सगळीकडे आहे. कुठलाही नवीन पिक्चर आला की, त्यांच्या कपड्यांपासून ते प्रत्येक गोष्टींची फॅशन बनते. त्यांच्या या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *