Bribe News

Bribe News : नांदेड महानगरपालिकेचा लिपिक ACB च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेताना अटक

489 0

नांदेड : नांदेड महानगरपालिकेमधून एक मोठी बातमी (Bribe News) समोर आली आहे. यामध्ये मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागातील लिपिकासह अन्य एकास 20 हजारांची लाच (Bribe News) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, रात्री उशिरा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश चिंताहरी काठीकर, (वय 52 लिपीक, स्थानिक संस्था कर व अतिरिक्त कार्यभार क्षेत्रीय कार्यालय क्र. 4, वजिराबाद, नांदेड) तसेच खाजगी ईसम मिर्झा अफजल बेग शमशोद्दीन बेग, (वय 54 वर्षे, व्यवसाय -ट्रान्सपोर्ट, रा. गुलजार बाग, गल्ली नं. 8, टिपु सुलतान रोड, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?
तक्रारदार हे स्वतःचे आणि त्यांचे भावाचे मालकीचे जागेत टीन शेड उभे करून त्यामध्ये कापड दुकान चालवतात. दरम्यान, 27 रोजी रविवार शासकीय सुट्टी असताना सुद्धा महानगरपालिकेचा कर्मचारी येवून त्यांचे बांधकामाची मोजणी करून गेला. तसेच जाताना महात्मा गांधी पुतळ्याजवळील महानगरपालिकेच्या कार्यालयात येवून भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार हे 28 रोजी कार्यालयात जाऊन मोजणी केलेल्या कर्मचाऱ्यास भेटले. त्याने, ‘तुमचे काम काठीकर साहेब यांच्याकडे असून, तेच तुमचे काम करणार आहेत’,असे सांगितले. तेव्हा तक्रारदार हे लिपिक काठीकर यांना भेटले. त्यांनी, ‘तुमचे बांधकाम महानगरपालिकेची परवानगी न घेता चोरून केले आहे. बांधकाम पाडून टाकावे लागेल आणि तुम्हाला दीड लाख रुपयाचा दंड लागेल’ असे सांगितले.

यानंतर तक्रारदार यांनी ‘साहेब बांधकाम पाडू नका, पाहिजे तर टॅक्स वाढवा’ अशी विनंती केली. तेव्हा लिपिक काठीकर यांनी या कामाचे मला वेगळे 20 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी लाच न देता काठीकर यांची थेट एसीबी कार्यालयात तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तसेच आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यानंतर शासकीय पंचासमक्ष यातील खाजगी आरोपी अफजल याने, तुमचे काम 40 ते 45 हजाराचे असून काठीकर साहेब फक्त 20 हजार रूपयामध्ये करून देत असल्याचे सांगितले. त्यामुळे आताच सांगा, असे म्हणत काठीकर यांना लाच देण्यास अफझलने प्रोत्साहन दिले. तेव्हा काठीकर यांनी आता मला फोन लावायचा नाही, अफजलकडे 20 हजार रूपये देवून टाका, असेही सुनावले आणि शासकीय पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती एजंट मिर्जा यांच्या मार्फत लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या घटनेमुळे नांदेड महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा ; महावितरणच्या प्रयत्नांना यश

Posted by - April 18, 2022 0
राज्यांत दिवसागणिक वाढत तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान व…
Sharad Pawar

पवारांनी आमदारांचे टोचले कान; महाविकास आघाडी एकसंध ठेण्याचे केले आवाहन

Posted by - May 17, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आज नेत्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद…
Dhule Murder

धुळे हादरलं ! राजकीय वादातून कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या

Posted by - May 26, 2023 0
धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धुळे तालुक्यातील उभंड- पिंपरखेड येथे एका राजकीय कार्यकर्त्याची गोळी…
Nilesh Rane

Nilesh Rane : फडणवीसांचा ‘तो’ सल्ला ऐकून निलेश राणेंनी निवृत्ती घेतली मागे

Posted by - October 25, 2023 0
मुंबई : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. ती आता त्यांनी…
Love Story

Seema Haider : ‘सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर…’ मुंबई पोलिसांना धमकी

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : पाकिस्तान सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सीमा हैदरला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *