Milk

जाणून घ्या… कच्चे दूध पिण्याचे काय आहेत धोके ?

591 0

कच्चे दूध आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आतडे आणि पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कच्च्या दूधाचे नियमित सेवन केल्यास जुलाब, पोटदुखी, डिहायड्रेशन, मळमळ, उलट्या, ताप, वजन कमी होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. कच्चे दूध विशेषतः गर्भवती महिला आणि मुलांसाठी हानिकारक आहे. आरोग्यासाठी नेहमी पाश्चराइज् दूध प्यावे. विशिष्ट तापमानाला दूध गरम करून हानिकारक जीवाणू नष्ट होत असल्याने ते पिण्यासाठी योग्य समजले जाते.

कच्च्या दुधात कॅम्पिलोबॅक्टर, क्रिप्टोस्पोरिडियम, ई. कोलाय, लिस्टेरिया आणि साल्मोनेला यांसारखे हानिकारक जीवाणू आढळतात. हे सर्व विषमज्वर, क्षयरोग, घटसर्प, क्यू ताप आणि ब्रुसेलोसिस यांसारख्या रोगांसाठी जबाबदार असू शकतात. कच्चे दूध पिणे आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कच्च्या दुधात आढळणारे धोकादायक बॅक्टेरिया गर्भवती महिलांसाठी अनेक धोके निर्माण करु शकतात. यामुळे गर्भपात, अकाली प्रसूती, गंभीर आजार आणि अगदी नवजात बालकांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कच्चे दूध पिणाऱ्या किंवा कच्च्या दुधापासून बनवलेले पदार्थ खाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याला गंभीरपणे हानी पोहोचू शकते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी ते अधिक धोकादायक ठरू शकते.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)च्या अहवालानुसार 1993 ते 2012 पर्यंत कच्चे दूध किंवा कच्च्या दुधाचे पदार्थ जसे की आइस्क्रीम, सॉफ्ट चीज आणि दही इत्यादींमुळे अनेक प्रकारच्या समस्या समोर आल्या आहेत. या सर्वांमुळे साधारणत: 1909 लोक आजारी पडले तर 144 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले. कच्चे दूध हे गाय, म्हैस, मेंढ्या, शेळ्या किंवा इतर कोणत्याही प्राण्यापासून मिळते. कच्च्या दुधात हानिकारक जीवाणू मारण्यासाठी पाश्चराइज् केले जाते आणि जर आपण अनपेश्चराइज् दूध प्यायले तर यातून गंभीर पोटाच्या समस्या निर्माण होत असतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!