ब्रेकिंग न्यूज, उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचे निधन

496 0

पुणे- प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे. बजाज हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते. पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपास आणण्यास राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कलकत्ता येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना 2001 साली पदमभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राहुल बजाज राज्यसभेचे सदस्य देखील होते. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.

राहुल बजाज सन 1968 मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर 30 व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘ बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत: ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष 1965 मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन 2008 मध्ये बजाजने सुमारे 10 हजार कोटींची उलाढाल गाठली .

पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल बजाज यांच्यानंतर 67 वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांचा फोर्थ सीटवरुन प्रवास! CM शिंदेंच्या कारमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Posted by - January 17, 2024 0
मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा…

सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवर; प्रकृती पुन्हा खालावली

Posted by - November 26, 2022 0
पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा…
Pune News

Pune News : सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने पुणे येथे केले ‘अस्मिता’ चे (दक्षिणी कथन) आयोजन

Posted by - April 14, 2024 0
पुणे : सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने(आवा) ‘अस्मिता’ (दक्षिणी कथन) लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या प्रेरणादायी कथाकथन मंचाचे 13 एप्रिल 2024…

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन संपन्न ; पहा थेट दृश्ये

Posted by - September 10, 2022 0
पुणे : शुक्रवारी सकाळी १० पासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरु आहेत . सकाळी ९ वाजता श्रीमंत दगडूशेट…

मोठी बातमी! शिंदे गटाची गोव्यातील बैठक संपली; एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

Posted by - June 30, 2022 0
मुंबई – अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *