मुंबई – अनेकदा अचानकपणे वाढलेली शुगर अनेक समस्या निर्माण करते आणि यामुळे ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. जर तुमची शुगर लेव्हल योग्य पद्धतीने नियंत्रणात येत नसेल तर अशा वेळी किडनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो किंवा अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. शरीरातील शुगर लेवल मर्यादेपेक्षा जास्त वाढली असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. काही घरगुती उपायाने आपण आपली शुगर नियंत्रणात आणू शकतो. काय आहेत हे उपाय ? जाणून घेऊयात..
पाणी पिणे
तज्ज्ञ मंडळींच्या मते जर तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल खूपच मर्यादेपेक्षा जास्त वाढली असेल तर अशा वेळी आपल्या शरीरातील शुगर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी आवश्य प्यायला हवे.
जांभूळ
जांभळामध्ये एंथोसायनिन, एलेजिक एसिड यासारखे अनेक गुणधर्म असतात आणि म्हणूनच हे पदार्थ आपल्या शरीरातील इन्शुलिनला नियंत्रित करते. जांभळीच्या बियांमध्ये विशेष करुन ग्लाइकोसाइड जम्बोलिन आणि अल्कलॉइड जंबोसीन हे घटक तत्त्व आपल्या शरीरातील ब्लड शुगरल लेव्हलला नियंत्रण करत असतात.
कारले
नियमितपणे कारले खाल्ल्याने तुमच्या शरीरातील शुगरची मात्रा हा मर्यादित राहते व त्याचबरोबर डायबिटीससुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. जर तुम्हाला शुगर सारख्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर अशा वेळी सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस अवश्य सेवन करावा. तुम्ही कारल्याची भाजी सुद्धा बनवून नियमितपणे खाऊ शकता असे केल्याने तुमची शुगर नियंत्रणात येईल.
नियमित व्यायाम
कोणत्याही प्रकारच्या आजारांना दूर ठेवायचे असेल तर आपल्याला नियमितपणे एक्ससाइज म्हणजेच व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नियमितपणे केलेला व्यायाम, एक्सरसाइज तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्या व्यक्तींना डायबिटीज शुगरची समस्या आहे अशा व्यक्तीने सुद्धा नियमितपणे एक्ससाइज करणे गरजेचे आहे.