मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदवार्ता आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग 9 फेब्रुवारीला आपली नवी स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S22 लाँच करणार आहे. कंपनीच्या या कार्यक्रमादरम्यान या सीरीजचे अनावरण करण्यात येणार आहे.
सॅमसंगच्या नव्या स्मार्टफोन सीरीजचे लॉन्चींग 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता आणि भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता होणार आहे. सॅमसंगने अद्याप लॉन्च होणाऱ्या उपकरणांचे अधिकृत नाव घोषित केलेले नाही, यामध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra यांचा समावेश असू शकतो, असे Gadgets360 च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सॅमसंग चा ‘Galaxy Unpacked’ इव्हेंट 9 फेब्रुवारीला रात्री 8:30 वाजता होणार आहे. इच्छुक ग्राहक Samsung च्या अधिकृत वेबसाइटवर Samsung Galaxy S22 लॉन्च इव्हेंट लाईव्ह स्ट्रीम करू शकतात.
जाणून घेऊया नेमके फिचर्स काय आहेत –
स्नॅपड्रॅगन मध्ये 8 Gen 1 आणि Exynos 2200 प्रोसेसरसह
120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले
50 MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा
12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज
3700mAh बॅटरी