बनावट दस्तऐवज तयार करून बुलडाण्यातील व्यापाऱ्याने बुडवला 100 कोटीचा जीएसटी

528 0

बुलढाणा- बुलडाणा जिल्ह्यात एका व्यापाऱ्याने बनावट दस्तऐवज वापरून, अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के याचा वापर करून तब्बल १०० कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

खामगाव येथील जीएसटी सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी खामगाव येथील MIDC मध्ये देवकी ऍग्रो इंडस्ट्रीचे मालक नितीन टावरी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी सांगितले की, खामगाव येथील MIDC मध्ये देवकी ऍग्रो इंडस्ट्रीचे मालक नितीन टावरी यांनी
जीएसटीचे तब्बल 100 कोटी रुपये बुडवल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून या व्यापाऱ्याने चक्क बनावट दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के सुद्धा बनावट वापरल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. टावरी याच्या मालकीच्या तब्बल 6 कंपन्या असून या कंपन्यांचे ऑडिट केल्यानंतर तब्बल 100 कोटी रुपयांच्या GST कर बुडवल्याचे समोर येईल असा दावा चेतनसिंग राजपूत यांनी केला आहे.

Share This News

Related Post

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे, त्यासाठी कालमर्यादा निश्चित व्हावी : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - March 25, 2023 0
मुंबई : विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना…

#Pre-Wedding Shoot साठी हि ठिकाण आहेत स्वर्ग ! प्लॅन करतं असाल तर पहाचं

Posted by - March 10, 2023 0
सध्या प्री वेडिंग शूट ट्रेंडमध्ये आहेत. यासाठी प्री-वेडिंग शूटसाठी कपल्स वेगवेगळ्या ठिकाणी जातात. यावेळी ड्रेसिंग सेन्सकडेही पूर्ण लक्ष दिलं जातं.…

पुणे विभागात ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार – विभागीय आयुक्त सौरभ राव

Posted by - November 2, 2022 0
पुणे : पुणे विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (३ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले…

धक्कादायक : आईनेच मुलांना असा दुःखद अंत का दिला ? घटनेने पोलिसही झाले हैराण

Posted by - March 4, 2023 0
इटली : टेक्सासमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. इटली, टेक्सास मध्ये आपल्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या केल्याप्रकरणी एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *