Narendra Modi Rally

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

717 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत असून यावेळी अनेक विकास प्रकल्पाचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहळा देखील आज पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात संपन्न होणार आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याविरोधात महाविकास आघाडी आंदोलन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत असून नरेंद्र एकीकडे मणिपूर जळत असताना दुसरीकडे पंतप्रधान पुरस्कार स्वीकारूच कसा शकतात असा सवाल करत महाविकास आघाडी पुण्यात आंदोलन करणार आहे महात्मा फुले मंडईत असणाऱ्या लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचा आज आंदोलन होणार आहे.

महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपही देणार आंदोलनानं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आज आंदोलन करणार असून महाविकास आघाडीचे हे आंदोलन म्हणजे केवळ नौटंकीपणा आहे असा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला असून या आंदोलनाला आज भाजपही आंदोलनात उत्तर देणार आहे.

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा 

सकाळी १०:१५ लोहगाव विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन

सकाळी १०:५५-कृषी महाविद्यालय,पुणे या ठिकाणी हेलिपॅड येथे आगमन

सकाळी ११ वाजता- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

सकाळी ११.४५- लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी एसपी कॉलेज या ठिकाणी पंतप्रधान येतील

दुपारी १२.४५- विस्तारित मेट्रो लाईन्सचे उद्घाटन

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे आणि पिपंरीतील चार हजार सदनिकांचे उद्घाटन

पुणे महानगर विकास मंडळाच्या सहा हजार घरांचे भुमीपुजन

दुपारी १.४५ ते २.१५ यादरम्यान आरक्षित वेळ

दुपारी २.२५ – कृषी महाविद्यालय , पुणे येथील हेलिपॅडवर येतील

२.५५- दिल्लीसाठी रवाना

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!