अनेक महिलांना केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची सवय असते. पण केस धुतल्यानंतर लगेच त्यावर टॉवेल गुंडाळल्याने तुम्हाला कोंडा किंवा इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच वेळ ओले राहते, त्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते.
केस धुतल्यानंतर ते टॉवेल गुंडाळल्याने स्कॅल्पला फंगल इंफेक्शन होऊ शकते. ज्यांना केस गळण्याची (Hair Fall) समस्या आहे त्यांनी ओल्या केसांवर चुकूनही टॉवेल गुंडाळू नये. कारण ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळल्याने ते तुटतात.
ओल्या केसांना टॉवेल बांधल्याने केसांची मुळे कमकुवत होतात, तसेच केस गळण्याची समस्यादेखील उद्भवू शकते. तसेच ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांची नॅचरल शाइन निघून जाते, तसेच केस कोरडे होऊ शकतात. केस सुकवण्यासाठी केस धुतल्यानंतर थोड्यावेळ मोकळे सोडा. त्यानंतर ड्रायरनं तुम्ही केस ड्राय करु शकता.