शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात २३ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
तूपकर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये जमले होते. मात्र त्याआधीच रविकांत तुपकर यांना घरातून ताब्यात घेतलंय. राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ते आंदोलन करणार होते.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, पोलीस मला कुठे नेतात ते बघू, त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरवू. पण सरकारला हे महागात पडेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय.