Mahayuti Seat Sharing

12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीला विधानसभा निवडणुकीनंतरच मुहूर्त? ‘या’ दिवशी होणार उच्च न्यायालयात पुढील सुनावणी

172 0

राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात निर्णय हायकोर्टाकडून घेण्यात आला असून हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जातोय.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती. कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

जून 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली होती. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी ती यादी मंजूर केली नाही. तसंच ती यादी फेटाळलीही नाही. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयीन वाद सुरू झाला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारनं पूर्वीच्या सरकारनं शिफारस केलेली यादी मागे घेतली. तसेच आपली नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली. हा निर्णय बेकायदा असून महाविकास आघाडीनं दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करा अन्यथा ही यादी मागे घेण्याचे सविस्तर कारण द्या, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली.पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या न करण्याचे निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांकडून कोर्टात आली.

ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत, असा दिलासा मुख्य न्यायमूर्तींना याचिकाकर्त्यांना दिला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारचा या याचिकेस विरोध आहे. यादी मागे घेणं हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आलं.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या आधी की विधानसभा निवडणुकीच्या नंतर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निर्णय होतो हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!