मिटसॉगच्या २० व्या तुकडीचा शुभारंभ १३ सप्टेंबर रोजी
पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान, डॉ. सी.पी.जोशी आणि डॉ. निलम गोर्हे यांची प्रमुख उपस्थिती
पुणे, दिः ११ सप्टेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’ (एमपीजी) २० व्या तुकडीचा शुभारंभ १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वा. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर हॉल येथे संपन्न होणार आहे.
पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान, राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ. सी.पी.जोशी व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांच्या हस्ते एमपीजी बॅच च्या २० व्या तुकडीचा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष, एनएलसी भारत आणि बीसीएसचे संस्थापक राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटी मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन व श्रीधर पब्बीशेट्टी हे उपस्थित राहणार आहेत.
सुशिक्षित युवकांनी राजकारणात यावे या उद्देशाने राहुल विश्वनाथ कराड यांनी २००५ साली राजकारणाचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था म्हणजेच एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट स्थापन करण्यात आली. २० वर्षात शेकडो विद्यार्थी बाहेर पडून देशातील विविध राजकीय पक्षांमध्ये उच्च पदस्थ आहेत. तसेच अनेक सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा कार्यरत आहेत.
अशी माहिती मिटसॉगचे प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर यांनी दिली आहे.