मुंबई: आगामी विधानसभा भाजपा सज्ज झाले असून नुकतीच भाजपाकडून 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे.
रावसाहेब पाटील दानवे हे या समितीचे अध्यक्ष असून दिलीप कांबळे यांच्याकडे संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर श्रीकांत भारतीय आणि अशोक नेते हे या समितीचे सहसंयोजक असणार आहेत याच समितीमध्ये निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या यांचा समावेश करण्यात आला होता.
मात्र किरीट सोमय्या यांनी संपर्कप्रमुख ही जबाबदारी नाकारली असून त्या संदर्भात समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना किरीट सोमय्या यांनी पत्र पाठवलं असल्याची माहिती समोर आली आहे.
आपल्याला न विचारता समितीमध्ये संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्ता म्हणूनच विधानसभा निवडणुकीमध्ये काम करत राहणार असं किरीट सोमय्या यांनी पत्रामध्ये म्हटलं असल्यास ची माहितीही आता समोर आली आहे