Bhayandar Crime

अखेर! ‘शीर’ नसलेल्या मृतदेहाचे उलगडले रहस्य; दोघांना अटक

795 0

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी एका पिशवीत शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचे गूढ उलघडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती आणि मेव्हण्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी एल्फा कंपनीच्या ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून पुढील तपासाला सुरुवात केली.

अशाप्रकारे झाला खुलासा ?
मृत तरुणीच्या हातावर त्रिशूल आणि ओमचा टॅटू बनवलेला होता. पोलिसांनी याच टॅटूच्या आधारावर मारेकऱ्यांचा शोध घेतला आहे.

पती आणि मेव्हण्याला अटक
मृत तरुणीचे नाव अंजली सिंग आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पती मिंटू सिंग आणि मेहुणा चुनचुन सिंग यांना अटक केली आहे. आरोपी मिंटू सिंगला पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे. 24 मे 2023 रोजी दोघांमध्ये भांडण झाले आणि मिंटू सिंगने रागाच्या भरात चाकूने गळा कापून पत्नीचा खून केला. यानंतर घरात असताना त्याने धडापासून डोके वेगळे केले आणि भाऊ चुंचुनच्या मदतीने शीर नसलेला मृतदेह सुटकेसमध्ये भरून भाईंदरच्या खाडीत फेकून दिला. यानंतर तो आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सासरी सोडून हैदराबादला गेला आणि तेथून पत्नीचे दागिने घेण्यासाठी तो मुंबईला परत आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दोन्ही आरोपींना दादर स्थानकातून अटक करण्यात आली.

Share This News
error: Content is protected !!