नवी मुंबई: राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभेसाठी सर्व पक्ष तयारी असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारानं इंस्टाग्रामवर केलेल्या धक्कादायक पोस्टनं एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणारे अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये अंबरनाथमधील काही समाजकंटक पक्षाच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अंबरनाथ मध्ये होणाऱ्या विकासकामांच्या विरोधात काम करत आहेत पण माझी हत्या झाली तरी चालेल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही व अंबरनाथ शहराचा सर्वांगीण विकास कधीच थांबू देणार नाही असं म्हटलं आहे.
दरम्यान आता डॉ. बालाजी किणीकर यांच्या पोस्टमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.