Viral Video

Viral Video : चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं अन्… आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

1406 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे डॉक्टर म्हणजे देवदूत मानला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत आहे. यामध्ये एका 18 वर्षांच्या मुलीने रुग्णालयाबाहेर तडफडत आपला जीव सोडला आहे. आजारी असल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार करण्यात आले, यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढलं. एखादं सामान सोपवावं तसं रुग्णालयाने मुलीला कुटुंबाकडे सोपवलं. तरुणी रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

18 वर्षीय मुलगी दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल होती. दरम्यान, व्हिडीओत मुलगी बाईकवर बेशुद्ध अवस्थेत बसलेली असून आई-वडिलांनी तिला पकडून ठेवल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केलं आहे. आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी फरार आहेत. दरम्यान, रुग्णालयाला पोलिसांनी सील केलं आहे. मैनपुरीच्या करहल रोडवर असणाऱ्या राधास्वामी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

पीडित मुलीला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी तिच्यावर चुकीचे उपचार केले. दोन दिवस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडू लागली. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयाबाहेर काढलं. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे. रुग्णालयातील कर्मचारी तिला बाईकवर बसवून निघून जातात. एक व्यक्ती तिला पकडून उभा असतो. तिथे उभी असणारी महिला धायमोकळून रडताना दिसत आहे. योग्य उपचार न मिळाल्याने अखेर मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिथेच सोडून रुग्णालयातील सर्व कर्मचारी फरार झाले असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!