आधी कोलकत्ता आणि आत्ता बदलापूर मधील चार वर्षीय चिमुकल्यांवर केलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरलेला असताना पुण्याहून देखील अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलीला बळजबरीने दारू पाजून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 2 मित्रांसह एका मैत्रिणीविरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपी तरुणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गंभीर घटना एप्रिल महिन्यात घडली आहे. 13 वर्षीय पीडित तरुणला आरोपी मैत्रिणीने तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी नेले. ही मैत्रीण पीडित तरुणीला रिक्षात बसवून मित्राच्या घरी पार्टीसाठी घेऊन गेली. पार्टीच्या ठिकाणी गेल्यावर पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने आणि मित्रांनी जबरदस्तीने दारू पाजली. दारूच्या नशेत असल्यामुळे पीडित तरुणीला शुद्ध नव्हती. याचाच गैरफायदा घेत त्या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. यातीलच एकाने या ठिकाणी या घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलवर रेकॉर्ड केला आहे.
दारूची नशा उतरल्यानंतर पीडित तरुणीला आपल्यासोबत नेमके काय घडले हे जाणवले. मात्र ती घाबरली असल्याने या प्रकरणाची कुठेही वाच्यता तिने केली नाही. मात्र या प्रकरणानंतर तिच्या वागणुकीची बदल दिसू लागल्यामुळे कुटुंबियांनी तिला याबाबतीत विचारणा केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. दरम्यान पीडित तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी देखील तात्काळ या प्रकरणी एका अल्पवयीन तरुण आणि इतर मित्रांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला.