नवी दिल्ली: संसदेचं सर्वोच्च सभागृह असणाऱ्या राज्यसभेतील 12 रिक्त खासदारांच्या जागेवर निवडणूक जाहीर झाली असून या जागांमध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या 12 जागा रिक्त झाल्या असून यामधील 9 खासदार लोकसभेवर तर दोन खासदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाले आहेत. 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून याच दिवशी राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे
महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या दोन जागांपैकी एका जागेवर आज भारतीय जनता पक्षाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून दक्षिण रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे.
कोण आहेत धैर्यशील पाटील?
शेतकरी कामगार पक्षाकडून आमदार राहिलेल्या धैर्यशील पाटील यांनी मागील वर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला
त्यानंतर त्यांच्याकडे दक्षिण रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली