स्वारगेट बस अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ता गाडेच्या शिकार ठरल्या सहा महिला

275 0

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये दत्तात्रय गाडे नावाच्या नराधमाने 26 वर्ष तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या तपासातून त्याचे नवनवीन पराक्रम समोर येत आहेत. याच नराधमाच्या राक्षसी कृत्यांना एक-दोन नाही तर तब्बल सहा महिला बळी पडल्या. या महिलांबरोबर दत्तात्रय गाडेने नेमकं काय केलं होतं?

मूळचा शिरूर चा असलेला आरोपी दत्तात्रय गाडे हा अनेक वर्षांपासून कोणताही कामधंदा न करता गैरमार्गाने पैसे कमावतो. अशाच पद्धतीने पैसे कमावण्यासाठी त्याने सुरुवातीपासूनच महिलांना आपलं शिकार बनवलं. त्याच्याविरोधात शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगरमधील सुपा पोलिस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे सगळ्या गुन्हांमध्ये तक्रारदार या महिलाच आहेत. गाडे हा एकट्या महिलांना टारगेट करायचा. बस स्थानकाच्या परिसरात बसची वाट पाहणाऱ्या महिलांना विश्वासात घेऊन इच्छित स्थळी पोहोचवतो असं सांगून त्यांना कार मध्ये बसवायचा. काही अंतरावर ही कार निर्जन स्थळी नेऊन महिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत लुटमार करायचा. नंतर त्या महिलांना तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढायचा. अशाच पद्धतीचे तीन गुन्हे त्याच्यावर अहिल्यानगर मधील सुपा कोतवाली आणि शिरूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर शिरूर आणि शुक्रापूर मध्ये ही दोन गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगरहून पुण्याला येणाऱ्या अनेक महिलांना त्याने अशाच प्रकारे गंडा घातला. त्याने लुटमार केलेल्या महिलांची संख्या ही जास्त असू शकते. कारण अनेक महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल केली नसण्याची शक्यता आहे. लूटमारी प्रमाणेच त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय विकृत होता. तो स्वतः पैसे कमावण्यासाठी तृतीयपंथीयांबरोबर शारीरिक संबंध ठेवायचा. त्यातून मिळालेल्या पैशांनी तो अनेक महिलांकडे शरीर सुखाची मागणी करायचा. त्याने एका भाजीविक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर गाडी थांबवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यानंतर संतापलेल्या महिलेने आरोपीच्या गाडीवर दगड मारला, त्यानंतर या नराधमाने तिथून पळ काढला. त्यामुळेच त्याच्यावर पाच लूटमारीचे तर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

आरोपी गाडी याच्या मनात सुरुवातीपासूनच महिलांविषयी विकृती भरलेली होती. त्यामुळेच महिलांना फसवून लुटण्यापासून ते त्यांना ब्लॅकमेल करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. या सहा गुन्ह्यां शिवाय लॉजच्या बाहेर बसून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे आणि शारीरिक सुख मागण्याचे उद्योगही या आरोपीने केलेले आहेत. एवढेच काय तर त्याने जानेवारी महिन्यात मुंबईतील एका महिला वकिलासह स्वारगेट परिसरात अशाच पद्धतीचं कृत्य करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र ही महिला त्याला बळी पडली नाही. त्यामुळेच जाणून-बुजून महिलांना सॉफ्ट टारगेट करणाऱ्या या हैवानाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशीच सर्वांची इच्छा आहे.

Share This News
error: Content is protected !!