मंत्री जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेला पाठवले विवस्त्र फोटो ? नेमकं प्रकरण काय

540 0

महायुतीच्या मंत्र्यांमागे लागलेलं ग्रहण काही केल्या सुटत नाहीये. आधी धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे आणि आता जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. या आरोपामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असली तरीही हे प्रकरण खरंतर आत्ताच नसून आठ वर्ष जूनं आहे. नेमकं हे प्रकरण काय पाहूया..

सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांचे महायुती सरकार मध्ये मंत्रीपदी वर्णी लागली आहे. सध्या ते राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आहेत. दरम्यान, 2016 मधे जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते. त्यावेळी आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली. त्यानंतर तब्बल दहा दिवसांची त्यांना तुरुंगवास भोगाव लागला. त्यानंतर त्यांना जाामिन मिळाला होता.

काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने त्यावेळी दाखल केलेली तक्रार तिच्या नावासहित काही व्हाट्सॲप ग्रुपवर शेअर केली जात आहे. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात आपल्याला निनावी धमकीच पत्र आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यामुळेच या महिलेने राज्यपालांना पत्र लिहून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात 17 मार्चपासून विधानभवना समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पीडित महिला ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचं राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळेच आज संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. मात्र यावर गोरे नेमकं काय म्हणालेत पाहूया.

आपली या प्रकरणात 2017 मध्येच निर्दोष मुक्तता झाली असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय. मात्र हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यामुळे आणि सदर महिलेने आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे गोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यामुळे ही महिला खरंच विधान भवना बाहेर उपोषणाला बसणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि तसं झाल्यास गोरे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते हे नक्की…

Share This News
error: Content is protected !!