सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा वाल्मीक कराडच असल्याचं सिद्ध झाल्यानंतर कराडबाबत आता पुन्हा एकदा सखोल चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड हा फरार झाला होता.. फरार असताना कराड आणि विष्णू चाटेने दोन दिवस नाशिकच्या दिंडोरी आश्रमात आश्रय घेतल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केला होता. आता वाल्मीकला दिंडोरीत आश्रय देणारे आश्रमाचे मठाधिपती गुरुमाऊली आणि त्यांच्या तिन्ही मुलांना सहआरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. आश्रमाचे मठाधिपती आणि त्यांच्या मुलांना या प्रकरणात शिक्षा होणार का?
खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराडला पोलीस शोधत होते, तेव्हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आण्णासाहेब मोरे म्हणजे गुरू माऊली यांच्या आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. दिंडोरीच्या आश्रमात जर त्यांना आश्रय दिलं गेला असेल तर तेथील जे प्रमुख आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना देखील सहआरोपी केलं पाहिजे, असही त्यांनी म्हटल होत. यानंतर दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. सीआयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले. त्यात वाल्मिक कराड 16 तारखेला दर्शनासाठी आले आणि निघून गेलेत. दत्तजयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते. त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते. त्यामध्ये कोण आले हे आम्हाला माहिती नव्हते, अस स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी म्हटल होत..आबासाहेब मोरे हे अण्णासाहेब मोरे यांचे पुत्र आहेत… अण्णासाहेब मोरे यांनी काही भक्त महिलांचं शोषण केल्याचा आरोपही तृप्ती देसाईंनी केला होता.. मागच्या वर्षी आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते.. त्या प्रकरणात वाल्मिक कराड यानं मध्यस्थी केली..त्याचेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात आश्रय देण्यात आला असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला होता.. याच सगळ्या आरोपांच्या आधारावर आता देसाईंनी आश्रमाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या मुलांना देखील सह आरोपी करण्याची मागणी केली आहे.
सीआयडीच्या तपासात कराड हा दिंडोरीतील केंद्रात येऊन गेल्याच याआधीच स्पष्ट झाल आहे. तो १६ आणि १७ डिसेंबर ला केंद्रात मुक्कामी होता.. त्यामुळे आता खंडणी आणि हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड यासह मुख्य आरोपी विष्णू चाटे यांना आश्रय दिल्याप्रकरणी अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या मुलांना सह आरोपी करण्यात येणार का. हे पाहणं महत्त्वाचं असेल. तृप्ती देसाई यांनी जर सहआरोपी केलं नाही तर दिंडोरी गुरु पिठाच्या कमानीच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोरे यांच्यावर कारवाई केली जाणार की नाही आगामी घडामोडींतून स्पष्ट होईल.