बदलापूरमधील अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली असून यामध्ये शाळेने पंधरा दिवसांचा सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याची बाब समोर आली आहे…
बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शिक्षण उपसंचालक स्तरावर तयार करण्यात आलेला वस्तूदर्शक चौकशी अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस झाल्या असून यामध्ये चक्क शाळेने सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचं समोर आलंय या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेंवर पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे