Death

पुण्यातील नदीपात्रात हात, पाय, डोकं कापलेला महिलेचा मृतदेह आढळला; पुणे शहरात एकच खळबळ

163 0

राज्यासह देशभरात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. अशातच संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणारी एक घटना पुण्यात आज सकाळी उघडकीस आली. पुण्यातील खराडी परिसरात असलेल्या नदीपात्रामध्ये हात पाय आणि डोकं कापलेलं महिलेचं धड नदीपात्रात आढळून आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी भागात असलेल्या नदीपात्रात लाईट कन्स्ट्रक्शनचे काम करणाऱ्या कामगारांना आज सकाळी नदीमध्ये मृतदेह तरंगत असताना दिसला. त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांना संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत दाखल होऊन पंचनामा केला आणि हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा मृतदेह 50 ते 60 वयोगटातील महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आजूबाजूच्या भागांमध्ये काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यापैकी कोणाचा हा मृतदेह आहे का याचा तपास सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

दरम्यान पुणे शहरात अशाप्रकारे मृतदेह आढळल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर खराडी चंदन नगर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!